Latest Marathi News
Ganesh J GIF

दिग्दर्शकाने या अभिनेत्रीला विचारली होती साईज

अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, जुन्या प्रियकराच्या चर्चेवरही सोडले माैन, म्हणाली त्याने विचारले की...

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीपासुन बराच काळ लांब असलेली अभिनेत्री शार्लिन चोप्राने ओटीटीवर रिलिज झालेल्या ‘पौरशपूर 2’ मधून पुनरागमन केले आहे. आता नुकताच एका मुलाखतीत तिने एका दिग्दर्शकावर गंभीर आरोप केला आहे. तसेच मधल्या काळात तिच्यावर आलेल्या संकटावर देखील तिने सडेतोड भाष्य केले आहे. तिच्या दाव्यामुळे कास्टिंग काऊचचा मुद्दा चर्चेत आला आहे.

शर्लिन चोप्राने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगावर बोलताना म्हणाली की, मला २०२१ साली समजले की माझी एक किडनी निकामी झाली आहे. त्यावेळी मला वाटलं की माझी वेळ आली आहे. त्यावेळी एवढ्या कठीण काळातही माझ्या कुटुंबातील कोणीही मला मदत केली नाही. पण तरीही आपण यातुन बाहेर पडलो असे तिने सांगितले. यावेळी तिने कास्टिंग काउचवर बोलताना तिला आलेला अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली “मला एका दिग्दर्शकाने विचारलं की तू ब्रेस्ट सर्जरी केली आहे का?, त्यावेळी मी सर्जरी केली असल्याचे तिने सांगितले. त्यावेळी तो दिग्दर्शक म्हणाला की, मी तुमच्या ब्रेस्टला स्पर्श करु शकतो का? तुमच्या कप आकार काय आहे? मला प्रश्न पडला की एखाद्या अभिनेत्रीच्या कप साइजबद्दल माहिती मिळाल्यावरच लोक थिएटरमध्ये जातात का? यानंतर मी त्यांना विचारलं की, तुमचं लग्न झालं आहे का? कारण जर त्यांचं लग्न झाले आहे का? दिग्दर्शक म्हणाला, ‘हो, पण मी माझ्या पत्नीशी जास्त बोलत नाही.’ तसेच तिने आपल्या प्रियकराबद्दल देखील भाष्य केले आहे. तिचा एक प्रियकर होता, जो एका प्रख्यात राजकारण्याचा मुलगा होता. यावेळी तिने त्याच्यासोबत आलेल्या अनुभवावर भाष्य करत तो वाईट अनुभव असल्याचे सांगितले आहे. दरम्यान शार्लिन सध्या ‘पौरशपूर २’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये ती राणी स्नेहलताच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेही शर्लिन चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. शर्लिनने साजिद खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.

शर्लिन चोप्रा एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबत मॉडेलदेखील आहे. शर्लिनने २००५ साली ‘टाइमपास’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. ‘बिग बॉस’ या लोकप्रिय कार्यक्रमातील तिसऱ्या पर्वात शर्लिन सहभागी झाली होती. एमटीव्हीच्या ‘स्पिल्ट्सविला’ या कार्यक्रमातदेखील शर्लिन सहभागी झाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!