
मनोहर मामाच्या वकिलांचा मास्टरस्ट्रोक? “पैसे मठात दिलेच नाहीत”; १ तासाच्या युक्तिवादानंतर केस फिरली!
व्यवसायात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवून 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला मनोहर मामा भोसले याला आज माढा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील आणि मनोहर मामाचा वकिलांमध्ये तब्बल एक तास जोरदार युक्तिवाद झाला.मनोहर मामाने किंवा त्यांच्या कोणत्याही साथीदाराने पैसे घेतलेच नाहीत, असा खळबळजनक दावा वकिलांनी न्यायालयात केला आहे.

मनोहर भोसले यांचे वकील ॲड. सुभाष हल्याळकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, फिर्यादीने दिलेले पैसे हे महाराजांच्या हातात किंवा मठातील कोणत्याही व्यक्तीकडे दिलेले नाहीत. मठाच्या बाहेर एका अनोळखी व्यक्तीला हे पैसे दिले गेले आहेत, त्यामुळे या प्रकरणाशी मनोहर मामांचा थेट संबंध जोडणे चुकीचे आहे. ही अटकच पूर्णपणे बेकायदा असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला.मनोहर मामा भोसलेला तीन दिवसांची पोलीस कोठडीदुसरीकडे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडली. भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या मनोहर भोसले याची इतर जिल्ह्यातही संपत्ती आहे का? तसेच पूर्वीच्या गुन्ह्यांमधील गुंतागुंत लक्षात घेता, या तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माढा न्यायालयाने मनोहर मामा भोसलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.एखाद्या रिसॉर्टला लाजवेल असा आलिशान आश्रम

मनोहर मामांच्या ज्या घोटी (ता. करमाळा) येथील आश्रमात भक्तांची मोठी गर्दी व्हायची, त्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. 27 एकरात पसरलेला हा आश्रम एखाद्या पंचतारांकित रिसॉर्टपेक्षा कमी नाही. मामाच्या दर्शनासाठी भक्तांना तब्बल 11 हजार रुपयांची पावती फाडावी लागत असल्याचे समोर आले आहे. या आश्रमासाठी खास राजस्थानवरून मार्बल मागवण्यात आले असून, संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली आहे.मनोहर मामाच्या आश्रमाला पोलीस छावणीचे स्वरूपदर अमावस्येला या ठिकाणी राजकीय नेते, श्रीमंत घरातील भक्तांची रेलचेल असायची. २७ एकरांच्या या परिसरात मोठी आमराई आणि प्रशस्त हॉलदेखील आहे. सध्या या आलिशान आश्रमाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून, पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता पोलीस कोठडीत मामांच्या या साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


