Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटातील ‘हा’ आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज

शिंदे गटातील नाराजी पुन्हा समोर, कारण सांगत शिंदेवरच टिका

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- उठावाची भाषा करत बाहेर पडलेल्या शिंदे गटातील खदखद आता बाहेर पडू लागली आहे.शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला मंत्री बनायचे आहे. त्यारूनच त्यांची नाराजी सारखी समोर येत आहे. शिंदे गटातील एका आमदाराची खदखद बाहेर आली असुन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या अख्त्यारीतील एक खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईच्या चांदीवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी आपली नाराजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी आपली नाराजी उघड उघड बोलून दाखवली.लांडे म्हणाले “अधिकारी वर्ग आपले ऐकत नाही. अधिकारी चुकीची माहिती देतात, मुंबई उपनगर जिल्हा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून सतत खोट सांगितल जात. मंत्र्यांना चुकीची माहिती दिली जाते. प्रशासनातील एकही अधिकारी काम करत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय जागेत नामफलक लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.पण दोन वर्ष झाले तरी साधा फलक लावता आलेला नाही. सूचना देऊनही पण काम होत नसतील. तर या बैठकीत आमदारांनी फक्त नाश्ता करायला बोलवता का? असा संतप्त सवाल लांडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेविरोधात नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे.

शिंदे फडणवीस सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस झाले आहेत.पण मंत्री आणि आमदारांमधील नाराजी कळीचा मुद्दा राहिला आहे. आधी मंत्रीपदावरुन असलेली नाराजी संपत असतानाच महत्वाच्या खाते न मिळाल्यामुळे नाराजी दिसून आली. आणि आता प्रशासन ऎकत नसल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराजी व्यक्त करत आहेत.त्यात शिंदेवरच सर्व आमदारांचा रोष असल्याचे चित्र आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!