![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
नाशिकनंतर पुण्यात या ठिकाणी द बर्निंग बसचा थरार
बसला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल, बघा पोलीस काय म्हणाले
पुणे दि १२(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये खाजगी बसला आग लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शज भीमाशंकर येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिमाशंकर रोडवर शिंदे वाडी येथे ही घटना आज पहाटेला सात वाजता घडली आहे. पण सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.पण आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबू बसप्पा सुरपूर हा भिंवडी येथील पाया गावातील २७ प्रवासी घेऊन मिनी बसने भिमाशंकर येथे देवदर्शनाकरीता चालले होते. बुधवारी सकाळी घोडेगाव भिमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडी येथे मिनी बस आली असताना अचसनक बसने पेट घेतला. बसने पेटताच बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले. त्यामुळे जिवीतहानी टळली. यावेळी प्रवाशांनी
पोलिसांना बस पेटल्याची माहिती दिली. माहिती कळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली.पण आगीचा भडका अधिक असल्याने आग विझवता आली नाही. या आगीत पूर्ण बस जळून खाक झाली आहे. बसला आग कशामुळे लागली याची माहिती पोलीस घेत आहेत. बसला आग लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन बसला आग लागली होती. यावेळी. खासगी बस आणि ट्रकची समोर धडक होऊन लागलेल्या आगीत अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे बसच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.