भाजपाकडुन या क्रिकेटरच्या पत्नीला आमदारकीचे तिकीट
गुजरात विधानसभा निवडणुकीत नवे चेहरे, भाजपाची नवी खेळी
गुजरात दि १०(प्रतिनिधी)- गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजपानेही परत सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना अनेकांना नारळ देण्यात आला आहे तर अनेक नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ८४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.यात एका क्रिकेटपटूच्या पत्नीला तिकिट देण्यात आले आहे.
भाजप नेते भूपेंद्र यादव आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी ही ही नावे जाहीर केली आहेत यात जामनगर उत्तरमधून भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रिवाबा जडेजाला स्थानिक कसे पाठिंबा देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गुजरातमध्ये भाजपाने मोठे धक्के देताना माजी मुख्यमंत्री रुपाणी पटेल यांना नारळ दिला आहे. तर अनेक आमदार आणि मंत्र्यांनाही घरचा रस्ता दाखवत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करता मोदींच्या नावाचा प्रचार भाजपाने सुरु केला आहे. आता रिवाबा पती जडेजाप्रमाणे विरोधकांची दांडी उडवणार का हे पहावे लागणार आहे.
गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी दोन टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे.पहिला टप्पा १ आणि दुसरा टप्पा ५ डिसेंबर असणार आहे. तर मतमोजणीही ८ डिसेंबरला होणार आहे. यावेळी भाजपाला काँग्रेसबरोबर आपचेही आव्हान असणार आहे.