Latest Marathi News
Ganesh J GIF

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ शिंदे गटाने भाजपला डिवचले

फडणवीसांपेक्षा शिंदेच सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचा दावा, शिंदे गटाच्या जाहिरातीमुळे युतीत वादाची ठिणगी

मुंबई दि १३(प्रतिनिधी)-शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. पण दोघांमधील वाद आता ठळकपणे समोर येत आहेत. भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना वगळण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक जागांवर आपला दावा केला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. असे असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वृत्तपत्रांतून एक जाहिरात देत थेट भाजपाला इशारा दिला आहे. त्यामुळे सेना भाजपा युतीत मिठाचा खडा पडला आहे.

राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे आशा आशायाची जाहिरात आज शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लावण्यात आली आहे. एका सर्वेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रितपणे केलेल्या कामाला राज्यातील जनतेने पसंती दिल्याचं समोर आले आहे. याच सर्वेचा आधार घेत शिवसेनेने सर्वच वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जनतेची देंवेद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचाही उल्लेख या जाहितीत करण्यात आला आहे.  शिवसेनेकडून आज बहुतांश वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देण्यात आली असून याध्यमातून सरकारच्या कामगिरीवर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट तुलना कधीही करण्यात आली नव्हती, मात्र जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये भारतीय जनता पक्षाला ३०.२% आणि शिवसेनेला १६.२% जनतेने कौल दिला. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४% जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणासाठी इच्छुक आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असा दावाच शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या जाहिरातीवर विरोधकांपेक्षा भाजपा नेत्यांकडून टिका करण्यात आली आहे. फडणवीस यांना डावलल्यामुळे भाजपाकडुन नापसंती व्यक्त करण्यात आली आहे.

भाजपा नेत्यांकडून आपल्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. असे अनेकदा सांगण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी तर आपण मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असे सांगितले होते. त्यामुळे शिंदे गटाकडून फडणवीसांना डावलताना हायकमांडला खुश केल्याने आगामी काळात काय राजकारण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!