दिल्ली दि १ (प्रतिनिधी)- देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे संसदेतही गदारोळ होत आहे. त्यात भर म्हणजे केंद्र सरकारने रोजच्या वापरातील वस्तूंबरोबरच स्टेशनरीवर टॅक्स वाढवला आहे. त्यामुळे महागाईत भर पडली आहे.त्यामुळे एका चिमुरडीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत तुम्ही महागाई वाढवली आहे. माझी आई मला पेन्सील लागताच मारते अशी तक्रार केली आहे. हे पत्र सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
कृती दुबे असं पत्र लिहिणाऱ्या मुलीच नाव आहे . ती उत्तर प्रदेशमधील कन्नोज जिल्ह्यातील छिबरामऊ नगरात राहाते. पहिलीत शिकणाऱ्या या मुलीने थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. तिने मोदींना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, “माझे नाव कृती दुबे आहे. मी इयत्ता पहिलीत शिकतो. मोदीजी तुम्ही खूप महागाई केली आहे. पेन्सिल रबरही महाग केले, आणि माझ्या मॅगीची किंमतही वाढली! आता पेन्सिल मागितली म्हणून आई मला मारते. मी काय करू. मुले माझी पेन्सिल चोरतात.” अशी तक्रार केली आहे. हे पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
केंद्र सरकारने वही, पुस्तकं, पेन्सिल, रबर अशा शालेय वस्तूंवरही अतिरिक्त टॅक्स लावला आहे. याच पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिण्यात आलं आहे. या पत्रावर आता मोदी काय उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.