Just another WordPress site

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा

पुरंदर मध्ये शिंदे गट करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

पुरंदर दि १ (प्रतिनिधी)- राज्यात सत्तापरिवर्तनानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली जाहीर सभा मंगळवारी म्हणजेच २ आॅगस्टला पुरंदर तालुक्यातील सासवड येथे होणार आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सभा होणार असल्याने मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सा-यांचे लक्ष असणार आहे.या सभेला शिंदे गटातील नेते उपस्थित राहणार आहेत.

GIF Advt

राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांची अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी निवड झाली. पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पुरंदर-हवेलीचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पहिल्यांदा पाठिंबा दर्शवला होता. पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणी प्रकल्प, फुरसुंगी-उरुळी पाणी योजना, हवेलीतील गावांचा अवाजवी कर आणि दिवे येथील राष्ट्रीय बाजार, अशा विविध विषयांवर मुख्यमंत्री काय बोलणार कोणती घोषणा करणार याकडे लक्ष असणार आहे.

मंगळवारी होणारी सभा मोठ्या पालखीतळ मैदानावर होणार आहे. या मैदानावर अनेक वर्षांनी सभा होत आहे.पुरंदर तालुक्यात सध्या काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत. पण आता शिवतारे शिंदे गटात गेल्यामुळे पुरंदर विधानसभा आणि बारामती लोकसभेची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!