Just another WordPress site

पाटसजवळ भीषण अपघातात आई, वडिलांसह चिमुकला जागीच ठार

साबळे कुटुंबावर काळाच घाला, हे ठरले अपघाताचे कारण

दाैंड दि २(प्रतिनिधी)- दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रक आणि दुचाकीचा मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. देवदर्नासाठी बाहेर पडलेल्या कुटुंबावर काळाने झडप टाकली आहे.

GIF Advt

मिळालेल्या माहितीनुसार, पाटस येथील रहिवासी संतोष साबळे हे आपल्या कुटुंबियांसोबत कुसेगाव येथील भानोबा देवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना पाटस येथील विश्वशांती बुद्ध विहार येथील कॅनॉलवरील गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाक मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने साबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे अपघात झाला. या अपघातात पाटस येथील पुनर्वसन येथे राहणारे संतोष सदाशिव साबळे, त्यांच्या पत्नी रोहिणी साबळे आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा गुरू साबळे यांचा जागीच मृत्यू झाला. साबळे कुटुंबियांवर अचानकपणे काळाने झडप घातल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कुसेगाव येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या जास्त असते. तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग देखील जास्त असतो परिणामी त्याचा फटका दुचाकीवाल्यांना बसत असल्याची खंत तेथील नागरिक व्यक्त करत आहेत. पण एका दुर्दैवी अपघातात संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!