Latest Marathi News
Ganesh J GIF

माझ्या नवऱ्याला बायको नाही तर मोलकरीन हवी होती

सुसाईड नोट लिहित शिक्षिकेने केली आत्महत्या, पतीच्या छळाचा उल्लेख, म्हणाली त्याच्या टोमण्यांनी...

दिल्ली – दिल्लीत केंद्रीय शाळेत शिकवणाऱ्या २९ वर्षीय महिला शिक्षिकेने गळफास घेत आत्महत्या केली. तिनं आत्महत्येआधी आई-वडील आणि भावाला व्हॉटसअपवर शेवटचा मेसेज केला होता. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

अन्विताच्या आत्महत्ये प्रकऱणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय. तर सासू मंजू घटनेनंतर फरार आहे. अन्विताने तिच्या शेवटच्या मेसेजमध्ये आपली निराशा आणि व्यथा मांडली आहे. अन्विताने तिच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, माझ्या पतीला एक सुंदर, कष्टाळू आणि नोकरी करणारी पत्नी हवी होती. मी सर्वतोपरी प्रयत्न केले पण मी त्यांच्यासाठी कधीच पुरेशी नव्हते. त्यांना वाटायचं की मी फक्त सासरी लक्ष द्यावं पण माझ्यासाठी माझे आई-वडील आणि भाऊसुद्धा महत्त्वाचे होते. गेल्या पाच वर्षात माझ्या पतीने मला टोमणे मारले तेवढे कदाचित कोणत्याच सासूनेही पत्नीला टोमणे मारले नसतील. माझ्या सासरच्या मंडळींना फक्त काम करणारी मोलकरीण हवी होती. मी खोट्या हसण्याने थकले होते. माझ्या पतीकडे माझे बँक अकाउंट, चेकबूक आणि सगळा एक्सेस होता. फक्त माझ्या मुलाची काळजी घ्या, तो त्याच्या वडिलांसारखा होऊ नये इतकंच वाटतं असंही अन्विताने म्हटले आहे. लग्नात २६ लाखांचा खर्च केला. घरासाठी आवश्यक साहित्यही दिलं. याशिवाय सोने-चांदीचे दागिने, कार दिली होती. तरी त्यांनी माझा छळ केला असा आरोप अन्विताने केला आहे.

दिल्लीत प्रॅक्टिस कऱणारा ड़ॉकटर गौरव कौशिक आणि त्याचे वडील सुरेंद्र शर्मा यांना अन्विताच्या आत्महत्ये प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर सासू फरार आहे. पण या घटनेने काैटुंबिक हिंसाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!