
घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पत्नीने केली पतीची हत्या
पत्नीचे प्रियकराच्या साथीने भयंकर कृत्य, मृतदेहाचे टुकडे करुन अशी लावली विल्हेवाट
मेरठ- उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एका विवाहित तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची अत्यंत भयंकर पद्धतीने हत्या केली आहे. हत्या करून पतीच्या मृतदेहाचे १५ तुकडे करत सिमेंटने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवले होते.
या प्रकरणात पोलिसांनी आता मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. सौरभ आणि मुस्कान यांचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता. या दोघांना एक मुलगी देखील आहे. मात्र या दरम्यान सौरभला मुस्कानचे साहिल शुक्ला नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले. त्यावरून त्यांची भांडणं होऊ लागली. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. मात्र नंतर मुलीच्या भविष्यासाठी वेगळं न होता एकत्र राहण्याचा निर्णय सौरभने घेतला. मात्र मुस्कानला वेगळे व्हायचे होते. दरम्यान सौरभने पैसे कमविण्यासाठी पुन्हा एकदा मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवली. २०२३ मध्ये तो कामासाठी बोटीवर गेला होता. २८ फेब्रुवारीला लेकीचा वाढदिवस असल्याने सौरभ २४ फेब्रुवारीला परत आला. मात्र या दरम्यान मुस्कान आणि साहिल जास्त जवळ आले होते. त्यामुळे त्यांनी कायमचा सौरभचा काटा काढायचे ठरवले. त्यांनी सौरभला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर गाढ झोपलेल्या सौरभची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर मृतदेह मार्गी लावण्यासाठी त्यांनी त्याच्या शरीराचे १५ तुकडे केले. मात्र हे तुकडे बाहेर कुठे फेकण्यापेक्षा त्याने सिमेंटच्या गोण्या आणल्या व त्याचे ओले मिश्रण तयार केले. त्यानंतर घऱातील ड्रममध्ये सौरभच्या शरीराचे तुकडे आणि सिमेंट टाकले. दरम्यान सौरभ फोन उचलत नसल्याने त्याच्या कुटुंबियांना संशय आला. यावेळी मुस्कानने सौरभ मनालीला गेल्याचे सांगितले, आणि सौरभचा फोन घेऊन मनालीचे फोटो काढून त्याच्या सोशल मीडियावर अपलोड केले. मात्र सौरभ फोन उचलत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर सगळा प्रकार समोर आला.
पोलिसांनी आता मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक केली आहे. ड्रग्जच्या नशेमुळे एका संसाराची राख रांगोळी झाली आहे.