
श्रसिंधुदूर्ग दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शिंदे सरकारने अनेक विकासकामांना स्थगिती दिली आहे. पण त्यावरुनच आज केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डीपीडीसी बैठकीत हा वाद झाला.
बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार विनायक राऊत यांनी विकास कामांना स्थगिती देण्याच्या प्रश्न उपस्थित केला. राऊत म्हणाले “मागच्या डीपीडीसी सभेमध्ये मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती का दिली गेली?” असा प्रश्न विचारला.यावेळी नारायण राणे यांनी अजेंड्यावरुन सभेला सुरुवात होऊ दे, तसेच हा विषय आयत्यावेळी घेतल्या जाणाऱ्या विषयांमधला आहे,असे सांगिले. यावर आक्रमक झालेल्या खासदार विनायक राऊत यांनी मी हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला आहे. आपण पालकमंत्री आहात का? असा सवाल केल्यमुळे वादाला सुरूवात झाली. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
राज्य सरकार कोसळल्यानंतर शिंदे सरकार अस्तित्वात आले.त्यांनी स्थगित केलेल्या विकास कामामुळे मोठे वादंग निर्माण झाले आहे. त्याचबरोबर राणे विरुद्ध शिवसेना वाद कायमच धगधगत राहिला आहे. त्यामुळे आज राणे राऊत भिडलेले पहायला मिळाले. आगामी काळात या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.