Latest Marathi News
Ganesh J GIF

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचे शंभराव्या वर्षी निधन

सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण, पार्थिवाला मोदींनीही दिला खांदा

गांधीनगर दि ३०(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले होते. पार्थिव यू. एन. मेहता रुग्णालयातून मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आले होते. मोदींनी घरीच आईच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कारासाठी नेण्यात आले यावेळी रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनी पार्थिवाला खांदा दिला.स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यू. एन. मेहता रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या मृत्यूची माहिती एका पत्रकाद्वारे जारी केली. जून महिन्यामध्ये आपला शंभरावा वाढदिवस साजरा करणा-या हिराबेन यांना २८ डिसेंबरला अस्वस्थ वाटू लागल्याने यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आईची भेट घेत विचारपूस केली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. पण आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोदींनी आईच्या निधनानंतर हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,मी तिला १०० व्या वाढदिवसानिमित्त भेटलो होतो तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, बुद्धीने काम करा आणि शुद्धपणे आयुष्य जगा” असे ट्विट मोदींनी केले आहे. हिराबेन यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली देण्यात येत आहे.

हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अनेकदा त्यांना भेटण्यासाठी जात होते. हिराबेन यांच्यसमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.

 

 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!