Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यातील रस्त्यावर मुळशी पॅटर्नचा थरार, कोयते नाचवत दहशत

नागरिकांवरील हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, पुण्यात सुरक्षेचे तीन तेरा

पुणे दि २९(प्रतिनिधी)- पुण्यात सिंहगड लॉ कॉलेज परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन परिसरातील दुकानदारांवर आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर वार करत दहशत निर्माण केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा एैरणीवर आला आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांनी मुळशी पॅर्टन चित्रपटाप्रमाणे हातात कोयते घेऊन दुकानात तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर हल्ले केले.या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली असून केवळ दहशत पसरवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.या प्रकरणी या प्रकरणी भारती पोलिस ठाण्यात अथर्व लडके याने पोलीसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी करण दळवी आणि सुजीत गायकवाड यांच्या विरोधात खूनाच्या प्रयनत गुन्हा दाखल आहे. या दोघांवर या पूर्वही खूनाचा, चोरीचा आणि खंडणीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. करण दळवी आणि सुजीत गायकवाड या दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली होती. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज रस्त्यावर त्यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास हातात चाकू सूरे घेऊन दुकांनात घुसून तसेच रस्त्यावर असणाऱ्या अनेकांना विनाकारण त्यांच्या हातातील शस्त्रांनी भोसकले. अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. हल्ल्यात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर आहे.

विधीमंडळात देखील पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पण अजूनही अश्या घटना सुरूच आहेत. या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. गुन्हेगार जर सर्वसामान्य नागरिकांवर राजेरोस हल्ले करत असतील तर सुरक्षेचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!