Latest Marathi News
Ganesh J GIF

क्रिकेटर रिषभ पंतच्या कारचा दिल्लीजवळ भीषण अपघात

अपघातानंतर कार जळून खाक,भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर

दिल्ली दि ३०(प्रतिनिधी)- भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या गाडीचा दिल्लीजवळ भीषण अपघात झाला आहे. दिल्लीहून हम्मदपूरकडे परतत असताना हा अपघात झाला. यावेळी ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. या अपघातामध्ये ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. गाडीची काच फोडल्यसमुळे रिषभ पंतचा जीव वाचला आहे.

ऋषभ पंत दिल्लीहून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला. ऋषभची कार रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथील एका वळणावर रेलिंगला धडकली. कार नारसन गावात आली असता कारचालकाचं गाडीवरील ताबा सुटला आणि रेलिंग तसेच खांबांना धडक देत कार पलटी झाली. ही धडक अत्यंत जोरदार होती. त्यामुळे कारला भीषण आग लागली. त्यामुळे बघता बघता कार जळून खाक झाली. या कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. या अपघातात ऋषभ पंतला मोठा मार लागला आहे. त्याच्या कपाळावर जबर मार लागला आहे. शिवाय ऋषभच्या पाय आणि पाठीलाही भीषण मार लागला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभला दिल्ली रोड येथील सक्षम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, तसेच तो बोलण्याच्या स्थितीमध्ये आहे.अशी माहिती डॉक्टरांनी दिली.अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दरम्यान ऋषभच्या कारमध्ये सुमारे तीन ते चार लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर सर्व रक्कम रस्त्यावर विखुरली होती. त्यांना तिथे त्रास होत राहिला पण यावेळी काही लोक ऋषभला मदत करण्याऐवजी खिशात नोटा भरण्यात आणि व्हिडिओ बनवण्यात मग्न झाले.

रिषभ पंत त्याच्या आईला भेटायला निघाला होता, पण अपघात झाल्यामुळे घरी होणारी भेट रुग्णालयात झाली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघातात जखमी झालेल्या रिषभ पंतच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. तसेच त्याच्यावरील उपचारांची योग्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या देशभरातुन रिषभसाठी प्रार्थना केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!