Latest Marathi News
Ganesh J GIF

TCS धर्मांतर प्रकरणाला नवे वळण; ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ आरोपींच्या पाठीशी

टीएससी कंपनीत काम करणाऱ्या एका अविवाहित तरुणीवरील बलात्कार आणि बळजबरीने धर्मांतर प्रकरणाने आता राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत असतानाच, आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे.

एकीकडे या प्रकरणातील संशयित आरोपींच्या समर्थनार्थ ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ मैदानात उतरली आहे, तर दुसरीकडे फरार आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आज अखेर नाशिक पोलिसांसमोर हजर होण्याची दाट शक्यता आहे.

माजी आमदार आसिफ शेख यांचा पोलिसांच्या तपासावर सवाल

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्यासह एकूण ७ आरोपींच्या पाठीशी ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ उभी राहणार असल्याची घोषणा इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे. आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर शेख यांनी पोलिसांच्या तपासावरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“खरात प्रकरण दाबण्यासाठीच हे प्रकरण जाणीवपूर्वक पुढे आणण्यात आले आहे. टीसीएस प्रकरणात कोणतेही तथ्य नाही. निदा खान यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले असून, न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या वेळी मी स्वतः हजर राहणार आहे.”
— आसिफ शेख, माजी आमदार

व्हॉट्सॲप चॅटमधून अत्यंत धक्कादायक खुलासा!

नाशिक पोलिसांच्या तपासादरम्यान एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक पुरावा हाती लागला आहे. संशयित निदा एजाज खान हिने तिच्या एका नातेवाईकासोबत केलेल्या व्हॉट्सॲप चॅटिंगमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

काय आहे चॅटमध्ये?

संशयितांनी रचलेल्या सुनियोजित कटानुसार पीडित तरुणीचे वर्तन सुरू झाले होते.या चॅटिंगवरून स्पष्ट झाले आहे की, पीडित हिंदू तरुणीचे नाव बदलून ‘हानिया’ असे ठेवण्यात आले होते.पोलिसांच्या दाव्यानुसार, या डिजिटल पुराव्यांमुळे संपूर्ण तपासाला आता मोठी गती मिळाली आहे.

एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आज पोलिसांना शरण येणार?

या गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान फरार असताना तिला आश्रय दिल्याचा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: (https://maharashtrakhabar.com/that-journey-turned-out-to-be-the-last-scorpio-falls-into-an-800-foot-gorge-in-ambenali-ghat-causing-premature-exit-of-8-friends/)

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!