
आता मंत्रिमंडळ मंत्रीपद मिळाले नाही तर….
बच्चू कडू यांचा एकनाथ शिंदे यांना मंत्रीपदावरुन इशारा, बघा काय म्हणाले
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- शिंदे गटाने शिवसेनेत बंड करत भाजप सोबत आपली चूल मांडली. यावेळी अपक्ष आमदारांनी शिंदे यांना साथ दिली. पण पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही अपक्ष आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण आता त्याच बच्चू कडू यांनी मोठ विधान करत शिंदेच्या अडचणी वाढल्या आहेत.
मंत्रिमंडळात विस्तारावर बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता आमचा प्रहार पक्ष शिंदे -भाजप सरकारमध्ये लहानसा पक्ष आहे, आता मंत्रिमंडळ मंत्रीपद मिळाले नाही तर अडीच वर्षानंतर मिळेल असे उलट उत्तर बच्चू कडू यांनी दिले यावरून मंत्रिमंडळात विस्तार न झाल्याने बच्चू कडू यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे.बच्चू कडू यांनी नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर अनेकदा माध्यमांशी बोलताना मंत्रीपद न मिळाल्यामुळे जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांसह आता बच्चू कडू यांनाही मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. पण सतत नवनव्या तारखा दिल्या जात असल्यामुळे त्यांचा संयम सुटत आहे. त्यामुळेच थेट एकनाथ शिंदे यांना इशारा देण्यात आला आहे.
मंत्री पदावरुन शिंदे गटातील धुसफूस अजूनही सुरूच आहे. कडू यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदावरुन नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची मनधरणी करणार का? असा प्रश्न आहे बच्चू कडू यांच्याशिवाय अनेक आमदार मंत्रीपदाची आस बाळगून आहेत. त्यामुळे शिंदे फडणवीस यांच्यावर नाराजीही वाढत आहे.