Just another WordPress site

प्रेम प्रकरणातून ठाण्यात तलवार आणि राॅड घेऊन राडा

तरुणांचा हाॅटेलमधील राड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

ठाणे दि १३(प्रतिनिधी)- प्रेमात कोण काय करील याचा नेम नसतो पण कधी कधी हे प्रेम गुन्हेगारीकडे देखील घेऊन जाते. असाच प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगर येथे एका हॉटेलमध्ये घुसून काही तरुणांनी तलवार आणि रॉड घेऊन काही तरुणांना मारहाण करत दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगर परिसरात काही तरुण तलवार आणि रॉड घेऊन एका हॉटेलमध्ये घुसले आणि हॉटेलमध्ये बसलेल्या दोन तरुणांना मारहाण केली. माझ्या प्रेयसीसोबत का बोलला या कारणावरून वादाला सुरुवात झाली आणि डोक्यात राग घेऊन आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही मारहाण करण्यात आली. सुदैवाने या मारहाणीत कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या मारहाणीनंतर या प्रकरणातील ७ ते ८ आरोपी फरार आहेत. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

GIF Advt

मारहाण प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी फरार असून वर्तकनगर पोलीस ठाण्यात सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु आहे. पण प्रेम प्रकरणातुन ही मारहाण झाल्याने या मारहाणीची चर्चा रंगली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!