
आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही आणि तुम्हालाही घरी बसून देणार नाही
एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवत फडणवीसांचा ठाकरेंवर निशाना
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही आणि तुम्हालाही घरी बसून देणार नाही” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. आगामी महापालिका निवडणूकीआधी खचलेल्य शिवसेनेच्या तावडीतून मुंबई महापालिका हस्तगत करण्याचा इरादा भाजपाने व्यक्त केला आहे. त्याच्या तयारीसाठी आज मुंबईत ‘लक्ष्य २०२२ मुंबई ध्येयपूर्ती’ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
फडणवीस म्हणाले की, आमचं सरकार आल्यापासून सर्व उत्सव जोरात सुरू आहेत. आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही आणि तुम्हालाही घरी बसून देणार नाही. आशिष शेलार अनुभवी आहेत त्यांनी अध्यक्ष पद संभाळले आहे, त्यांना पुन्हा अध्यक्ष केलं याचं कारण, आपण छत्रपतींना मानतो. इतिहासात जेव्हा एखादी मोहीम असायची ती स्वराज्यसाठी महत्वाची असते. तेव्हा महाराज बिनीचा शिलेदार नेमायचा असतो मागच्या वेळी आपण ३५ वरुन ८२ वर गेलो, आता यावेळी मागच्या पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचे आहेत. यासाठी शेलारांना जबाबदारी दिल्याचे फडणवीस म्हणाले. मुंबई महापालिका परिवाराची ठेवायची नाही. जशी निवडणूक जवळ येईल तसे ते इमोशनल विषय आणणार पण यंदा महापालिकेवर बाळासाहेंबांच्या विचाराचा भगवा फडकवायचाच असे फडणवीस म्हणाले आहेत.त्यामुळे आगामी निवडणूक ठाकरे विरूद्ध फडणवीस अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत गेले म्हणून शिंदे दिल्लीश्वरासमोर झुकले असं म्हणतात. दिल्ली ही पॉलिटीकल राजधानी आहे त्यामुळे तिथे जावंच लागेल. ते लोक दिल्लीत गेले नसतीलही पण सोनियांजीसमोर नतमस्तक होण्याकरता ठाकरे दिल्लीत गेले होते. त्यामुळे मुंबईही दिल्लीसमोर झुकणार नाही. पण मुंबईच्या हितासाठी जितक्या वेळा जावं लागेल तितक्या वेळा मी दिल्लीत जाणार,’ असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.