Latest Marathi News
Ganesh J GIF

अरे! यांना कोणी तरी आवरा, समुद्रकिनारी जोडपे सुसाट

मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर जोडपे रोमँटिक, व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर अनेक जोडपी फिरायला येत असतात. त्यातील काही जोडपी भलतीच उत्साही असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये मुंबईतील मरीन ड्राईव्हवर एक जोडपं एकमेकांना किस करताना कॅमे-यात कैद झाले आहे.

अरबी समुद्राच्या काठावर असलेल्या मुंबईचा मरिन ड्राइव्ह पर्यटकांसाठी अतिसय प्रसिद्ध ठिकाण आहे. याठिकाणी मुंबईतील अनेक जोडपी आपला खास वेळ घालवण्यासाठी येतात. पण सध्या सोशल मिडीयावर एक जोडपे रोमान्स करताना दिसत आहे. त्यांचा रोमान्स कॅमे-यात कैद झाला आहे. यात ते जगाची पर्वा न करता किस करताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ @Viral Baba नावाच्या युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. अनेक यूजर्सनी हा व्हिडिओ शेअर करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मरीन ड्राइव्हला कपल पॉइंट म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे हे कपल जगाची पर्वा न करता एकमेकात गुंग झाले आहे. या व्हिडिओत त्यांच्या शेजारी तिथे इतरही अनेक जोडपी बसलेली दिसत आहे. पण त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

आकर्षक रोषणाईमुळे मरीन ड्राइव्ह रात्री खूप सुंदर दिसते. त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी जात असतात. असाच एक व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याचबरोबर या ठिकाणी लाच घेण्याचाही प्रकार समोर आला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!