Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नाच्या दिवशी नववधू लग्नमंडपाएैवजी गेली भलतीकडे

व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, बघा नवरी नक्की गेली कुठे

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. यावर कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. आता सध्या सोशल मिडीयावर एका नवरीची तुफान चर्चा सुरू आहे. यात नवरीची एैन लग्नादिवशी भलतीच धावपळ उडाली आहे.

आजकाल आपण लग्न करण्यापूर्वी मतदान केले. किंवा आधी परिक्षा देऊन मग लग्नविधी पार पाडले अशा बातम्या पाहिल्या किंवा वाचल्या असतील. सध्या व्हायरल व्हिडिओत एक तरुणी नववधूच्या पोशाखात गाडीत बसलेली आहे. पण ती लग्नमंडपात न जाता दुसऱ्याच ठिकाणी जात आहे. . ही तरुणी लग्न मंडपात न जाता थेट कॉलेजमध्ये जाते. कारण तिची प्रात्याक्षिक परीक्षा सुरु असते. तरूणीने परिधान केलेल्या अॅप्राॅनवरुन ती तरुणी मेडीकलची विद्यार्थीनी वाटत आहे. त्यामुळे त्या तरूणीने आधी परिक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे काैतुक केले आहे. यातून बदलत्या जीवनशैलीचे देखील दर्शन झाले आहे.

नववधूचा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड धुमाकूळ घालत असून व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट येत आहेत. grus_girls नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार ट्रेंडिगमध्ये आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!