Latest Marathi News
Ganesh J GIF

सेल्फी दिला नाही म्हणून या क्रिकेटपटूवर चाहत्याचा हल्ला

हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, बघा मारहाणीआधी नेमके काय घडले

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वीच्या कारवर मुंबईत हल्ला झाला असून बेसबॉल स्टिकने काही अज्ञातांनी त्याच्या कारच्या काचा फोडल्या असून गाडीचे मोठे नुकसान केले आहे. या हल्ल्यामागे सेल्फी न दिल्याचे कारण सांगितले जात आहे.

पृथ्वी शाॅने सेल्फी काढायला नकार दिल्यानं ८ जणांच्या जमावाने कारवर बेसबॉल स्टिकने हल्ला केला. यात कारच्या काचा फोडण्यात आला आहेत. पण या हल्ल्याआधी शाॅचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र क्लबमध्ये गेले होते. यावेळी एक महिला चाहतीने पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्याचा आग्रह धरला होता. यादरम्यान एकदा सेल्फी घेतल्यानंतर चाहती आणि तिच्या मित्रांनी अजून एक सेल्फी देण्याची विनंती केली, त्याला अडवताना पृथ्वीची चाहत्यांसोबत झटपट झाली. त्यामुळे सेल्फी घेणाऱ्या चाहत्यांनी पृथ्वीच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केला. या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पृथ्वी शॉ क्रिकेटबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत असतो. वेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर तो गर्लफ्रेंड निधीबरोबर लग्न केल्याची चर्चा होती. पण माझ्यासोबत खोडसाळपणा केला आहे. माझा आणि त्या व्यक्तीचा कोणताही संबंध नाही. माझे कोणतेही रिलेशन नाही. असे शाॅ म्हणाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!