Latest Marathi News
Ganesh J GIF

देशातील चार हजार आमदारापैकी सर्वाधिक आमदार कोणाकडे?

कोणत्या पक्षाकडे किती आमदार, टाॅप टेन पक्षांची यादीत शिवसेना राष्ट्रवादीचा कितवा नंबर?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- देशात गल्लीपासुन दिल्लीपर्यंत प्रत्येक पक्ष आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील असतो सध्या भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर बहुसंख्य राज्यातही त्यांची सत्ता आहे. देशात भाजपाचे ३०४ खासदार आहे. तर काँग्रेसचे ५२ खासदार आहेत. हे आपल्याला माहित आहे. पण देशात कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत याची पूर्ण माहिती कोणाकडे नसते तर आपण आज त्याचीच माहिती पाहूया.

भारतात २८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश दिल्ली आणि पाँडीचेरी मिळून देशात एकूण ४ हजार ३३ आमदार आहेत. सर्वाधिक आमदार भाजपाचे आहेत. भाजपाचे तब्बल १३७० आमदार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून त्यांचे ७७१ आमदार आहेत. म्हणजेच भाजपाच्या निम्मेच आमदार दुस-या क्रमांकावर असणाऱ्या काँग्रेसकडे आहेत. यावरून भाजपाच्या प्रभावाचा अंदाज येतो. तिसऱ्या क्रमांकावर ममतांचा तृणमूल काँग्रेस आहे. त्यांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या २१५ आहे. तर सर्वात कमी काळात आपने चाैथा क्रमांक पटकावला आहे. आपकडे १६१ आमदार आहेत. पाचव्या क्रमांकावर वायएसआरसीपी असून त्यांचे १५१ आमदार आहेत. तर सहाव्या क्रमांकावर डीएमकेचे १३३ आमदार आहेत. सपाचे ११३, बीजेडीचे ११२, सीपीआय एमचे ८९, टीआरएसचे ८८ असे आमदार बलाबल आहे. ही आकडेवारी गुजरात निकालानंतरची आहे. दरम्यान महाराष्ट्राचा विचार केल्यास भाजप १०६, शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५३ काँग्रेस ४४ असे प्रमुख पक्षाचे बलाबल आहे. शिवसेना पक्षाचे प्रकरणात न्यायालयात असल्याने निवडणुकीवेळीची आकडेवारी देण्यात आली आहे.

भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष असून देशातील ११ राज्यांत भाजपाचा मुख्यमंत्री आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपुर, त्रिपुरा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, सिक्किम आणि पाँडिचेरीमध्ये भाजपाच्या सहकारी पक्षांची सत्ता आहे. तर हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, या राज्यात काँग्रेस सत्तेत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!