Just another WordPress site

‘बॉयफ्रेंड’ वरून तीन विद्यार्थिनींची रस्त्यावरच हाणामारी

ओैरंगाबदमधील रस्त्यावर मुलींची फ्रिस्टाईल हाणामारी व्हिडिओ व्हायरल

ओैरंगाबाद दि २९(प्रतिनिधी)- बॉयफ्रेंड’वरून एका महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघींनी एका तरुणीला अगदी डोक्याचे केस धरून आणि बेल्टने मारहाण केली.या वादाचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. कॉलेजच्या विद्यार्थिनी बॉयफ्रेंडवरून भिडल्याचे समोर आल्याने जोरदार चर्चा सुरु आहे.

ओैरंगाबाद शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन मुलींनी एका मुलीला चांगलीच मारहाण केली. यावेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची भांडण सोडवण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. दोन मुलींनी त्या मुलीला नेमके कशामुळे मारले हे मात्र समजू शकले नसले तरी मुलींच्या मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मुलींची हाणामारी चालू असताना महाविद्यालयाच्या इतरही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. बघ्यांनी फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. हाणामारी करणाऱ्या विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. एरव्ही मुलांचे अशा प्रकारे भांडण झाल्याचे आपण नेहमी बघतो पण आता मुलींमध्ये देखील अशा प्रकारची फ्री स्टाईल हाणामारी पहायला मिळत आहे.

GIF Advt

मध्यंतरी नाशिकच्या एका महाविद्यालयात मुलींमध्ये राडा झाला होता.दोन मुलींमध्ये बसण्यावरून वाद झाला. यावेळी कँटीन चालकांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर या मुली भांडत भांडत बाहेर पडल्या. यावेळी क्षुल्लक कारणाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. तर एका ठिकाणी पाच जणींनी एका मुलीची धुलाई केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!