Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅलीवूडमधील हे रोमँटिक कपल लवकरच अडकणार लग्नबंधनात?

तीन वर्षांपासून करत आहेत डेट,या महिन्यात बांधणार लग्नगाठ

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील रोमँटिक कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी लवकरच एक गुड न्यूज देणार आहेत. मागील तीन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आता या दोघे लवकरच लग्न करणार असून २०२३ मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी सुपरहिट चित्रपट ‘शेरशाह’ मध्ये प्रदर्शित झालेली सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी ही जोडी सध्या बी-टाऊनची सर्वात लोकप्रिय जोडी बनली आहे.

रिपोर्ट्सनुसार, या दोघांचं लग्न दिल्लीत होणार आहे. ते रजिस्टर लग्न करणार असल्याची चर्चा आहे. नंतर कॉकटेल पार्टी देणार आहेत. दोघांच्या लग्नाला बॉलिवूडमधील कोणालाही आमंत्रित केले जाणार नाही कारण सिद्धार्थ-कियारा यांचे कुटुंब आणि नातेवाईकांसह दिल्लीत लग्न होणार आहे. आधी दोघे लग्नाची नोंदणी करतील आणि नंतर रिसेप्शननंतर कॉकटेल पार्टी देतील.ते लग्नानंतर मित्रांसाठी कियारा आणि सिद्धार्तचे ग्रँड रिसेप्शनही असणार आहे. पुढील वर्षी २०२३ च्या एप्रिलमध्ये यांचं लग्न होऊ शकतं.मात्र यावर कियारा आणि सिद्धार्थने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनंतर सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियाराचं नाव ट्रेंड होऊ लागलं आहे.शेरशाह सिनेमाच्या शूटिंगवेळी या दोघांची जवळीव वाढली होती. २०२१ मध्ये हा सिनेमा हीट ठरला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!