Just another WordPress site

राज ठाकरेंची युतीसाठी उद्धव दादू ऎवजी भाजपाला टाळी

राज यांच्या मदतीने मुंबई जिंकण्यासाठी भाजपाचा हा प्लॅन

मुंबई दि ३० (प्रतिनिधी) – यंदा काहीही करुन मुंबई महापालिका जिंकायचीच असा चंग भाजपाने बांधला आहे. त्यामुळे भाजपाने नवीन मित्र जोडण्याचा सपाटाच लावला आहे. पण आता भाजपाने मनसेबरोबर युती करण्याबरोबर शिक्कामोर्तब केले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीत यावर चर्चा करण्यात आली असून लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे. या युतीमुळे शिवसेना आणि शिंदे गटाच्या अडचणी वाढणार आहेत.

GIF Advt

मागील दोन दिवसांपासून मनसे आणि भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीदेखील ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली आहे. पण युतीच्या शक्यतेला बळ देणारी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावरील भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.पण जसजसं निवडणूक जवळ येईल तसं चित्र अधिक स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे. मुंबईत मनसेचा फायदा करुन घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तर भाजपाच्या साथीने विदर्भात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा मनसेचा प्रयत्न असणार आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी राज उद्धव यांच्या टाळीवर बोलत शिवसेना मनसे युतीची चर्चा सुरु झाली होती. शिंदे भाजप युतीमुळे मनसे दुरावल्याची चर्चा होती. पण राज ठाकरे फडणवीस भेटीमुळे मनसे भाजपाला टाळी देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!