Just another WordPress site

‘मोदी इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं’

शरद पवार असे का म्हणाले? सत्ताबदलामुळे पवारांची 'ही' रणनिती

ठाणे दि २९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीवर सडकून टिका केली आहे.’माझं बोट पकडून राजकारणात आलेले नरेंद्र मोदी इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं’ असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. शरद पवार महाराष्ट्राच्या दाै-यावर असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपावर टिका केली.

GIF Advt

ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी जोरदार टिका केली. घेतली. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, भाजपने २०१४ मध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अच्छे दिन येणार असं म्हणत भाजपने आश्वासनं दिली होती. अच्छे दिन लोकांना पाहायला मिळालेच नाही, उलट भाजप लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतंय’, माझं बोट पकडून आलेले नरेंद्र मोदी इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं २०२२ पर्यंत प्रत्येकाजवळ हक्काचं पक्कं घर असेल, प्रत्येक घरात पाण्याचा नळ असेल, २०१८ पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत इंटरनेट सुविधा असेल, अशी आश्वासने भाजपने जनतेला दिली होती. मात्र भाजपने सांगितलेली एकही आश्वासने अजून पूर्ण केली नाही. असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजपकडून ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांवर दबाव आणल्यासाठी केला जात असल्याचा आरोपही शरद पवारांनी केला. महिला अत्याचार रोखण्यासाठी मोदी सरकारकडून कुठलेही प्रयत्न केले जात नाहीये. अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!