Latest Marathi News
Ganesh J GIF

निवडणूकीच्या अट्टाहासामुळे विवाहित महिलेच्या आयुष्याचा शेवट

अकोल्यातील राजकीय घराण्यातील वादामुळे पोलिसांची ही कारवाई

अकोला दि ३० (प्रतिनिधी)- निवडणूकीमुळे अकोल्यात एका विवाहितीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोलातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरीतील. जयश्री नागेला पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी माहेरहून ५ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी तगादा लावला होता. यामुळे एक लहान मुलगी मात्र आईच्या प्रेमाला मुकली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एक वर्षापुर्वी जयश्रीचा विवाह आशिष नागे यांच्यासोबत झाला. आशिष खासगी शेतीचा व्यवसाय करतो, तर सासरचेही राजकीय क्षेत्रात आहेत. सासरे वसंतराव मारोती नागे हे वंचित बहुजन आघाडीकडून पंचायत समिती सदस्य राहले असून अकोला पंचायत समितीचे माजी सभापती देखील राहिले आहेत. तर सासू शोभा नागे या सध्या पंचायत समिती सदस्य आहेत. लग्नाच्या सुरुवातीला सासरच्यांनी जयश्रीला चांगलं वागविलं. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. निवडणुकीसाठी ५ लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी या लोकांनी तगादा लावला होता. जयश्रीने आतापर्यंत २ लाख ५० हजार रुपये सासरी आणून दिले होते. तरीही त्रास सुरूच होता, तसेच मुलगी झाल्यामुळे जयश्रीला जास्त त्रास देण्यास सुरुवात झाली होती.त्यामुळे जयश्रीने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे.

जयश्रीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून उरळ पोलीस स्टेशनमध्ये सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी पती आशिष याला पोलिसांनी अटक केली आहे. उरळ पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!