Just another WordPress site

सोलापूरच्या श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा, महिलेच्या व्हायरल व्हिडिओने माजलेली खळबळ…बघा नेमक पुढ काय घडल..?

पुणे विशेष प्रतिनिधी : गेल्या काही दिवासांपूर्वी राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. कारण एका नेत्याचा महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ त्या नेत्यासोबत उपस्थित महिलेने व्हायरल केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सोलापूरचे नेते श्रीकांत देशमुख यांचे एका महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेले क्षण टिपण्यात आले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे सोलापूर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पत्नी असताना याने माझ्याशी संबंध ठेवले असा थेट आरोप या महिलेने त्यांच्यावर केले होते. हे प्रकरण आता डेक्कन पोलिसांत पोहोचलं आहे आणि आता श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण पुण्यात श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात याच प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आधी त्यांच्याविरोधात महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. तसेच याच प्रकरणात त्यांचं जिल्हाध्यक्ष पदही गेलं आहे.

व्हिडिओमध्ये महिला शेजारी बसलेल्या नेत्याकडे बोट दाखवत गंभीर आरोप करत आहे. ती संबंधित नेत्याकडे रडताना आणि ओरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की श्रीकांत देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. काही दिवसांपूर्वीच श्रीकांत देशमुख यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. नेते श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा देताना कोणतेही कारण दिलेले नाही.

GIF Advt

      हा व्हिडिओ 28 सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये नेते श्रीकांत देशमुख महिलेसोबत दिसत आहेत. हॉटेल किंवा कोणत्याही घराच्या बेडरूमचा हा व्हिडिओ असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात देशमुख पलंगावर बसलेत त्याचवेळी ही महिला रडत रडत त्यांच्यावर गंभीर आरोप करत आहे आणि देशमुख उठून संबंधित महिलेचा कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सगळं त्या व्हिडिओत स्पष्ट दिसून आलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!