Latest Marathi News
Ganesh J GIF

जादा भाड्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालकाची प्रवाशाला बेदम मारहाण

रिक्षाचालकाची दादागिरी सीसीटीव्हीत कैद, प्रवाशी जखमी, आरटीओचे होतेय साफ दुर्लक्ष

डोंबिवली दि २९ (प्रतिनिधी)- डोंबिवलीत रिक्षाचालक आणि प्रवाशी या दोघांमध्ये प्रवासी भाड्यावरून वाद झाला. यावरून मुजोर रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबीवली पूर्वेकडील इंदिरा चौकात घडली आहे. या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली हे चाकरमान्यांचे शहर म्हणून ओळखले नसते. येथे कायमच रेल्वे स्थानकानंतर रिक्षा स्टँडवर गर्दी पहायला मिळते. पण त्यामुळे रिक्षा चालकांची दादागिरी वाढल्याचे पहायला मिळत आहे. कल्याण पूर्व भागात राहणारे गणेश तांबे हे आपले कामकाज आटपून नेहमीप्रमाणे डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात जाऊन टाटा पॉवर पर्यंत शेअर रिक्षेने जाण्याचे ठरविले. गणेश हे रिक्षापर्यंत गेल्यानंतर भाडे किती घेणार असा प्रश्न रिक्षा चालकाला त्यांनी विचारला. त्यावेळी रिक्षा चालकाने भाडे वाढवून सांगितल्याने त्यांनी इतके भाडे होत नाही.असे रिक्षा चालकाला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर चिडलेल्या रिक्षावाल्यांनी त्यांना रिक्षेतील बांबू काढून मारल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तांबे जखमी झाले असून त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. मात्र रिक्षावाल्यांची ही वाढती दादागिरी पाहून डोंबिवलीतील सर्वच प्रवासी घाबरले आहेत. कल्याण डोंबिवलीतील रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिस आणि आरटीओचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असुन रिक्षा चालकाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

याआधी देखील महिला पत्रकारांना रिक्षा चालकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. दरम्यान रामनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या अनोखळी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या रिक्षाचालकाचा शोधाला सुरूवात केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!