राज्यसभा खासदार या अभिनेत्री सोबत बांधणार लग्नगाठ
दोन्ही कुटुंबियांची बोलणी सुरु, खासदाराच्या ट्वीटमुळे लग्नाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बाॅलीवूड आणि राजकारणी यांचे पहिल्यापासुनच एकमेकांबद्दल आकर्षक राहिलेले आहे. नुकताच अभिनेत्री स्वरा भास्कर आणि राजकारणी फवाद आलम यांचा विवाह पार पडला त्यानंतर आणखी एक अभिनेत्री एका खासदारासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
बॉलीवूड अभिनेत्री परीणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत.आता या दोघांच्या नात्याबद्दल आम अदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत महिती दिली आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा..तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा, असं ट्वीट खासदार संजीव अरोरा यांनी केलं आहे. संजीव अरोरा यांनी आपल्या ट्वीटमध्ये परिणीती आणि राघव चड्ढा यांचा फोटो शेअर केला आहे. एखाद्या जबाबदार व्यक्तीनं चोप्रा आणि चढ्ढा यांच्या अफेरवर जाहीरपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. अरोरा यांच्या ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे. राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. यूकेमध्ये शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली होती. तसेच मागील काही दिवसापुर्वी ते एकत्र दिसले होते. नंतर दोघांच्या कुटुंबीयांचीही भेट झाली होती, आता लवकरच साखरपुडा होणार असल्याची चर्चा आहे.
I extend my heartfelt congratulations to @raghav_chadha and @ParineetiChopra. May their union be blessed with an abundance of love, joy, and companionship. My best wishes!!! pic.twitter.com/3fSWVT4evR
— Sanjeev Arora (@MP_SanjeevArora) March 28, 2023
या वर्षी जानेवारीमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना ‘इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशात पहिल्यांदाच या दोघांना हा सन्मान मिळाला आहे. दरम्यान लवकरच या दोघांच्या नात्याबद्दल औपचारिक घोषणा केली जाणार आहे.