Latest Marathi News
Ganesh J GIF

सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

थलयवाच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा, राजकीय लढाईत रजनीकांत ठाकरेंसोबत?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- सुपरस्टार रजनीकांत सध्या मुंबईमध्ये आहेत. काल वानखेडे स्टेडिअममध्ये मॅच पाहिल्यानंतर रजनीकांत यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता ही भेट महत्वाची मानली जात आहे.

अभिनेते रजनीकांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रजनीकांत यांनी उद्धव ठाकरे यांची ही सदिच्छा भेट होती. ही कुठलीही राजकीय भेट नव्हती, रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सिम चाहते आहेत. रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध अतिशय चांगले आहेत. त्यामुळेच रजनीकांत ठाकरे कुटुंबीयांची सदिच्छा भेटीसाठी आले होते, असे सांगण्यात आले आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सदिच्छा भेटीशिवाय आणखी काही कारण होते का याचे उत्तर मिळाले नसले तरी ती शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित होते. रजनीकांतजी पुन्हा एकदा मातोश्रीवर आल्याने आम्हाला खूप आनंद झाला, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. यापूर्वीही रजनीकांत हे मुंबई दौऱ्यावर असताना बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी रजनीकांत त्यांच्या रोबोट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत होते आणि त्यांनी मातोश्रीवर बाळा साहेबांची भेट घेतली होती.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिल्या भारत – ऑस्ट्रेलिया वनडे क्रिकेट सामना पाहण्यासाठी रजनीकांत यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर ते खास मुंबईत आले होते.स्टे़डियममधला कॅमेरा रजनीकांत यांच्यावर जाताच वानखेडेमधील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. यातून रजनीकांत यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये असलेली क्रेझ आजही कायम आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!