Latest Marathi News

व्हॅलेंटाइन वीकमध्ये धावत्या बाईकवरचा रोमान्स प्रेमी युगलाला महागात

व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एंट्री, पोलीसांनी शिकवला धडा

अजमेर दि ८(प्रतिनिधी)- सध्या सगळीकडे व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात आहे.पण राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अजमेरमधील व्हिडिओत एक तरुण बाईक चालवत असल्याचे दिसत आहे. तरुणीच्या त्याच्या समोर बसलेली आहे. दोघेही अजमेर येथून पुष्करच्या दिशेने चालले होते. या घटनेची शहरात चर्चा सुरु आहे. सोशल माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजमेरच्या ख्रिश्चन गंज पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे प्रेमी युगलाची ओळख पटवली आहे. साहिल मैसी असे तरुणाचे नाव आहे. तसेच दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. सध्याची तरुणाई ही सोशल माध्यमांवर अवलंबून आहे, त्यात आता व्हेलेंटाईन वीकचे फॅड दिसत असल्यामुळे अशा घटना वारंवार समोर येत आहेत.

 

याआधीही सोशल माध्यमांवर असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.छत्तीसगडच्या भिलाई येथे धावत्या बाईकवर रोमान्स करणं एका प्रेमी युगुलाला चांगलंच महागात पडले होते. तर लखनऊमधील हजरतगंज येथील एका तरुण आणि तरुणीचा स्कुटीवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!