समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन
आजारपणामुळे होते रूग्णालयात, शिक्षक ते नेता थक्क करणारा प्रवास
दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. २२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारण पोकळी निर्माण झाली आहे
मुलायमसिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ मध्ये उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात जन्म झाला होता. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव यांची नेताजी म्हणून ओळख होती. १९६७ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार बनले. १९९१ साली मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर त्यांनी १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली त्यांनी ३ वेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. केंद्रीय रसहकारणात १९९६ते ९८ या काळात त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री पदाची जबाबदारीही सांभाळली होती. विद्यमान लोकसभेचे ते सदस्य होते. मागील महिन्यात मुलायम सिंह यादव यांना यूरीन इन्फेक्शन झाले होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हलही कमी झाली होती. त्यामुळे त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून होती.पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचं जुलै महिन्यात निधन झालं होतं. तर, पहिल्या पत्नी मालती देवी यांचं २००३ मध्ये निधन झालं होतं. कुस्ती करून नंतर शिक्षकी पेशात आलेल्या मुलायम सिंहांनी राजकारणाचेही मैदान मारले होते. त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.