Just another WordPress site

उद्धव ठाकरेंचे केंद्रीय निवडणूक आयोगालाच आव्हान

चिन्ह धनुष्यबाण की दुसरे चिन्ह फैसला आता दिल्लीच्या मैदानात

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिट याचिका दाखल करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चिन्ह आणि नावांचे पर्याय देखील सुचवले आहेत. एकाच वेळी ठाकरे गटाने दोन खेळी खेळल्या आहेत.

GIF Advt

ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नवा गोठवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच ही तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर सोमवारी किंवा मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. निवडणुक आयोगाचा निर्णय अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधात धनुष्यबाणासाठी ठाकरे गटाने न्यायालयाकडे दाद मागितली आहे.

त्याचबरोबर शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्ह म्हणून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय सादर केले आहेत. मात्र हे तिन्ही पर्याय निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचं समोर आलं आहे.दरम्यान ठाकरे गटाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय काय निकाल देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!