Latest Marathi News
Ganesh J GIF

‘शहिद’ अतिक आणि अश्रफच्या हत्येचा बदला घेणार’

भारताला दहशतवादी हल्ल्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क, मशिदीबाहेर घोषणाबाजी

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- अतिक आणि अशरफ हत्या प्रकरणात दहशतवादीकडून मोठी धमकी मिळाली आहे. अल-कायदाने अतिकच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेने या हत्याकांडाचा बदला घेणार असल्याचे सात पानी मासिक प्रसिद्ध केले आहे .

कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्याकांडाने देशात खळबळ उडाली आहे. नुकतेच पटना येथील मशिदीबाहेर अतिक अमर रहे अशा घोषणा काहींकडून देण्यात आल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटने सात पानी मॅगझिन जारी करत गँगस्टर अतिकच्या हत्येवरून भारतात दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. आपल्या संदेशात अल-कायदाने भारताचा बदला घेणार असल्याचे या मॅगझिनमध्ये म्हटले आहे. याशिवाय या दहशतवादी संघटनेने अतिक आणि अशरफ यांचा ‘शहीद’ असा उल्लेख केला आहे. या धमकीनंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील संवेदनशील भागांसह प्रयागराजमध्ये सुरक्षा अधिक मजबूत केली आहे. दरम्यान अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर तपासात गुंतलेल्या पोलिस पथकांसमोर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. अतीकचे सुमारे ८०० नंबर अचानक बंद झाले आहे. या सर्व मोबाईल क्रमांकावर पोलिसांची नजर होती. बंद झालेल्या क्रमांकांची तपासणी केली जात आहे, त्यांचे कॉल डिटेल्स घेतले जात आहेत. अतिकला अरुण मौर्य, सनी आणि लवलेश तिवारी यांनी ठार मारले. याच्या दोन दिवस आधीच झांसी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मारला गेला होता.

प्रयागराजमध्ये १५ एप्रिलच्या रात्री माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या बंदोबस्तात अरुण मौर्य, सनी आणि लवलेश तिवारी या नेमबाजांनी ही हत्या केली. तिघेही पत्रकार म्हणून आले, त्यानंतर अतिक आणि अशरफ यांचे माध्यमांशी बोलणे सुरू करताच तिघांनीही गोळीबार केला. या गोळीबारात अतिकला ८ गोळ्या लागल्या. या हत्येचा पोलीस तपास सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!