Latest Marathi News
Ganesh J GIF

शरद पवार गटाचा हडपसर विधानसभेसाठीचा उमेदवार ठरला?

चेतन तुपे यांना शरद पवार यांचा दणका, हडपसरमधील निष्ठावंत प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर

पुणे दि ११(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी जसे आमदारांना घेऊन जसे शिवसेनेत बंड केले. आता अगदी त्याच धर्तीवर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत आमदारांना सोबत घेऊन बंड केले. आणि भाजपासोबत सत्तेत सामील झाले. आता अजित पवार गटाने पक्षावर दावा केला आहे. पण शरद पवार यांनी सुद्धा आता पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. पण आता शरद पवार यांनी पुढची खेळी करत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हडपसरमधून पक्षाच्या वतीने उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना साथ देणारे आणि तळ्यात मळ्यात करणाऱ्या नेत्यांची अडचण होण्याची चिन्हे आहेत.

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. हडपसरमधील आमदार चेतन तुपे सध्या यांचे अजून काहीच निश्चित होताना दिसत नाही. कारण चेतन तुपे हे कधी शरद पवार यांच्या मंचावर दिसतात तर कधी अजित पवार यांच्या मंचावर दिसतात. त्यामुळे शरद पवार गटाने पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना हडपसरमधून उमेदवारी देत तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. वास्तविक प्रशांत जगताप हे २०१९ मध्ये देखील आमदार होण्यासाठी उत्सुक होते. पण पक्षाने चेतन तुपे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे जगताप यांची संधी हुकली होती. पण आता प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. कारण पक्षात बंड झाल्यानंतर शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे सांगणारे प्रशांत जगताप हे पुण्यातील पहिले पदाधिकारी होते. मी हडपसर मतदारसंघामध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक असून निवडणूक लढवणार आहे. २०१९ मध्ये देखील मी इच्छुक होतो पण संधी मिळाली नाही. पण आता यंदा मात्र आपण विधानसभा निवडणुक लढणार आणि जिंकणार असा दावा एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत जगताप यांनी केला आहे. दरम्यान निवडणुक आयोगात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पाठवलेल्या अपात्रतेच्या यादीत पुण्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे शरद पवार आता इतर मतदारसंघात नवीन उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात चेतन तुपे यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. ते सध्याची परिस्थिती पाहता अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे. पण आता हडपसरमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे शहरात उमेदावारी जाहिर करत शरद पवार यांनी अजित पवार यांना धोबीपछाड दिली आहे. कारण सुनील टिंगरे आणि चेतन तुपे या दोन आमदारांची नावे अपात्रतेच्या यादीत आहेत. पण अजित पवार यांच्या सोबत मंचावर दिसणे, चेतन तुपे यांना महागात पडल्याची चर्चा आहे. पण आगामी हडपसर विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!