Just another WordPress site

प्रेमी युगलाचा भररस्त्यात बाईकवर रोमान्स

व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, स्टंटसाठी जोडप्यांचे वाट्टेल ते चाळे, संताप व्यक्त

लखनऊ दि २२(प्रतिनिधी)- अलीकडे बाईकवर रोमान्स करण्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे.या घटनांचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.प्रसिद्धीसाठी आणि लाईक्ससाठी असे स्टंट केले जात असल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

व्हायरल झालेला व्हिडिओ हरदोई येथील सीतापूर रोडवरील इटौली गावाजवळचा आहे.
व्हिडिओमध्ये  एका तरुणाने त्याच्या प्रेयसीला बाईकच्या पेट्रोल टाकीवर बसवलं आहे. तर मुलगी एका बाजूला पाय सोडून बसल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही बाईकवर रोमान्स करताना दिसत आहेत. पण यांचा निष्काळजीपणा रस्त्यावरील इतर लोकांच्या जीवावर बेतला असता. या प्रेमी युगुलांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. सोशल मीडियावर लोकांनी या दोघांवर खूप टीका केली आहे. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस बाइक क्रमांकाच्या आधारे या जोडप्याचा शोध घेत आहेत.ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान व्हायरल होत असलेल्या या जोडीला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

GIF Advt

चार भींतीमध्ये करणाऱ्या गोष्टी आजकाल खुल्यापणे केल्या जात आहेत. एवढेच नाही तर त्यस सोशल मीडियावर अपलोड करत लाईक आणि व्हिव्ज मिळवले जात आहेत.प्रसिद्धीसाठी प्रेमी युगुल कुठल्याही थराला जात आहेत. मध्यंतरी असेच काहीसे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!