Latest Marathi News
Ganesh J GIF

बॉस सोबत रोमान्स करणं तिला पडलं भारी…..

गाझियाबाद – एका युवतीने तिच्या बॉसवर मनापासून प्रेम केलं, पण त्याच प्रेमामुळे तिचा घात झाला. तिला हकनाक जीव  गमवावा लागला. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरूणीचा नाद सोडण्यास सांगूनही पती ऐकत नाही हे पाहून त्याच्या पत्नीनेच तिच्या हत्येचे प्लानिंग केले. याप्रकरणी पोलिसांनी ५  लोकांना अटक केली आहे.

लव्ह ट्रँगलची ही कहाणी गाझियाबादच्या मुरादनगर ठाणे क्षेत्रातील आहे. खरंतर , २१ वर्षांची रागिणी हिचे बंटी या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते.तो तिचा बॉस होता. दोघेही नोएडा येथे एकत्र प्रॉपर्टीची कामे करत असत. ते दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र बंटी हा विवाहीत होता आणि त्याच्या या प्रेमप्रकरणामुळे त्याची पत्नी, राखी खूप त्रासली होती. पण बंटी काही तिचे ऐकत नव्हता.

अखेर तिने भावासह रचला प्लान

राखीने पती, बंटी याला बऱ्याच वेळे समजावले, पण त्याने रागिणीला भेटणे बंद केलेचे नाही. त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे राखी व बंटी यांच्यात सतत वाद व्हायचे. अखेर राखीने, तिचा भाऊ अमित याला हे सर्व सांगितले अन् मग त्यांनी एक भीषण प्लान आखला. राखी आणि अमितने हत्येचा कट रचला.

पुलावरून फेकला मृतदेह

त्यानंतर अमितने रागिणी हिला त्याच्या घरी, राखी हिची भेट घेण्यासाठी बोलावले. त्यानंतर तिला शस्त्राचा धाक दाखवत कारमध्ये बसवले आणि सुराना गावाजवळ हिंडन नदीकिनारी घेऊन गेला. तेथे त्याने रागिणीची गोळी मारून हत्या केला आणि तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकून ते सर्वजण तेथून फरार झाले.

मिळाला तरूणीचा मृतदेह

या प्रकरणी डीसीपी ग्रामीण विवेक चंद्र यादव यांनी सांगितले की, ३ ऑगस्ट रोजी मुरादनगर पोलीस स्टेशनमध्ये एका तरूणीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. रागिणी असे या तरुणीचे नाव असून ती नोएडा येथील रहिवासी आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहे. यामध्ये २ ऑगस्टच्या रात्री मयत रागिणीला घेण्यासाठी अमित त्याच्या कारमधून तिच्या घरी गेल्याचे दिसून आले होते.

५  जणांना केली अटक

या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये खुनाचा कट रचणारी महिला राखी, तिचा भाऊ अमित, करण, अंकुर हे त्याचे दोन मित्र आणि राखीचा पती बंटी याचाही त्यामध्ये समावेश आहे. मात्र, खुनासाठी बंदूक पुरवणारे आणखी दोघे फरार असल्याचे समजते. पोलिसांनी याप्रकरणी राखीचा पती बंटी यालाही अटक केली. कारण त्याला रागिणीची हत्या झाल्याचे समजल्यानंतर त्याने पत्नीला वाचवण्यासाठी आणि आरोप नष्ट करण्यासाठी मदत केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!