Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे सरकारचे जिल्ह्यातील पालकमंत्री ठरले?, यादी जाहीर

स्वातंत्र्यदिनी हे मंत्री या जिल्ह्यात करणार ध्वजवंदन, सरकारकडून यादी जाहीर

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन दीड महिना संपला असला तरीही सरकारकडून अजूनही अजित पवार गटातील मंत्र्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. या सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे अजूनही पालकमंत्री पदाची जबाबदारी रिक्त आहे. पण स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोणी झेंडावंदन करायचा असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण आता शिंदे सरकारने यावर तोडगा काढला असून, कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे.

राज्य सरकारने पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ज्या जिल्ह्यांची नावे नाहीत तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. अजित पवार सत्तेत सहभागी होताच सत्ताधारी शिंदे गटात संभाव्य मंत्रिपदावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर पालकमंत्री पदावरून भरत गोगावले यांनी अदिती तटकरे यांच्यावर केलेली टिका खुप बोलकी होती. तसेच काही जिल्ह्याची अदलाबदली होणार असल्याने युतीत मोठी धुसफूस सुरु आहे. पण सध्या तरी यावर तोडगा काढण्यात शिंदे सरकारला यश आले आहे.

मंत्री आणि जिल्हा
देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे – पालघर

जिल्हाधिकारी रायगड –  रायगड
जिल्हाधिकारी हिंगोली –  हिंगोली
जिल्हाधिकारी वर्धा –        वर्धा
जिल्हाधिकारी गोंदिया –   गोंदिया
जिल्हाधिकारी भंडारा –    भंडारा
जिल्हाधिकारी अकोला –   अकोला
जिल्हाधिकारी नांदेड –       नांदेड

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!