Just another WordPress site

घटस्फोटानंतर हनी सिंग पहिल्यांदा नव्या गर्लफ्रेंडसोबत मिडीयासमोर

कार्यक्रमातील दोघांचा व्हिडिओ व्हायरल, गर्लफ्रेंडच्या लुकचे चाहते दिवाने

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- प्रसिद्ध रॅपर हनी सिंग नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो.मध्यंतरी तो आपल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत आला होता. आता गर्लफ्रेंडबरोबर एका कार्यक्रमात दिसल्याने पुन्हा एकदा त्याच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. गर्लफ्रेंडचा हात पडकडून चालणाऱ्या हनी सिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

GIF Advt

हनी सिंग पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतल्यानंतर आता तो मॉडेल टीना थडानीला डेट करत आहे. एका कार्यक्रमात त्याने गर्लफ्रेंड टीनासह हजेरी लावली. यावेळी सर्वांसमोर त्याने टीनाचा हात पकडलेला दिसला. मागच्या बऱ्याच काळापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या पण ते दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत.या व्हिडीओमध्ये टीना सर्वांचे लक्ष वेधत होती.तसेच तिच्या हातात महागड्या ब्रँडची पर्स होती ज्याची किंमत जवळपास २.५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हनी सिंगची गर्लफ्रेंड टीना थडानी त्याच्या ‘पॅरिस का ट्रिप’ या गाण्यात दिसली होती.त्यावेळी तो डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान त्याची पहिली पत्नी शालिनीने हनी सिंगवर अनेक आरोप लावले होते. हनी सिंगने आपल्याला मारहाण केली तसेच त्याच्या वागण्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर बराच परिणाम झाल्याचं शालिनीने म्हटलं होतं.पण हनी सिंगने सर्व आरोप फेटाळले होते.

हनी सिंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.काहींनी नव्या गर्लफ्रेंडसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी नव्या गर्लफ्रेंडला सर्वांसमोर आणण्यासाठीच तू घटस्फोट घेतला आहे. असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. पत्नी शालिनी तलवारपासून २०२२ मध्ये वेगळे झाल्यानंतर तो थडानी सोबत डेट करत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!