मुस्लीम समाजाच्या मिरवणूकीत वाजले शिवसेनेचे गीत
मुस्लीम समाजाचा ठाकरेंच्या शिवसेला पाठिंबा, 'त्या' प्रतिमेने वेधले लक्ष
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद जवान ओैरंगजेबचा गाैरव करत मुस्लीम समाजाला अप्रत्यक्षपणे साद घातली. पण शिवसेनेपासून फटकून राहणारा मुस्लीम समाज ठाकरेंच्या शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र मुंबईत पहायला मिळत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ मुंबईच्या भायखळा परिसरातील आहे. काही दिवसांपूर्वी ईद ए मिलादच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांनी या परिसरात एक मिरवणूक काढली होती. त्यावेळी मिरवणुकीत चक्क शिवसेनेचे ‘जात गोत्र अन् धर्म आमचा शिवसेना शिवसेना हे गीत वाजवण्यात आले.त्याचबरोबर या मिरवणुकीत शोभायात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या ताजियावर भगव्या रंगातील महाराष्ट्राची प्रतिमा दिसत होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानिमित्ताने मुंबईतील मुस्लीम मतदार शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. हा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंसाठी महत्वाचे संकेत आहेत. पण यामुळे भाजपाच्या मिशन मुंबईला शिंदेना सोबत घेऊनही खीळ बसणार आहे. राज्यात जरी शिंदेंच्या बंडामुळे पडझड झाली असली तरी मुंबईत संघटना ठाकरेंच्या बाजूने आहे. आता मुस्लीम मतदारांची साथ मिळाल्यास ठाकरेंचे पारडे जड होणार आहे.
*मुंबई भायखळा येथील ईद ए मिलाद ची मिरवणूक, उद्धवजींमुळे मुस्लिम बांधव सुद्धा शिवसेना, भगवा आणी महाराष्ट्राच्या प्रेमात महाराष्ट्र बदलतोय*🚩 pic.twitter.com/4vTLHZWURf
— Darshan Bhanage (@DarshanBhange2) October 11, 2022
उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाबरोबरच मी मुंबईकर म्हणत
सगळ्या सर्वसमावेश संदेश दिला आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात हिंदूत्वाची भुमिका स्पष्ट करताना देशप्रेमी मुस्लीम म्हणत शहीद ऒैरंगजेबचा उल्लेख ठाकरेंनी केला होता. विशेष म्हणजे या दसरा मेळाव्याला अनेक मुस्लीम शिवसैनिकांची उपस्थिती होती. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी बळ मिळणार असून भाजप शिंदे गटाच्या अडचणी वाटणार आहेत.