Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक घटना ! तीन चिमुकल्यांना कासव दाखवतो म्हणून तरुणाने विहिरीजवळ नेलं अन्…

नाशिकमधील सिन्नर तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांना विहिरीत कासव असल्याचं सांगत तीन लहान चिमुकल्यांना ढकलून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यात वडगाव पिंगळे येथे घटना घडली आहे.

पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस अधिकचा तपास सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. अथर्व घुगे, वरद घुगे आणि आदित्य सानप अशी चिमुकल्यांची नावे आहेत. त्यावेळी तिथे असलेल्या अमोल लांडगे याने मुलांना विहिरीमधील कासव असल्याचं सांगत ते दाखवण्यासाठी विहिरीजवळ नेलं. तिथेच संशयित विक्रम माळी, साईनाथ ठमके आणि अमोल यांनी भरलेल्या विहिरीमध्ये तिन्ही मुलांना ढकलून दिले आणि तिथून पलायन केले.

मुलांमधी एकाने विहिरीतील मोटारीच्या दोरीला पकडलं आणि बाहेर येऊन इतर दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. सुरूवातील तिघांनीही घरी काही सांगितलं नाही. ओल्या झालेल्या कपड्यांमुळे घरच्यांना संशय आला आणि मुलांना विश्वासात घेत त्यांनी काय झालं याबद्दल विचारल्यावर मुलांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी अमोल लांडगे याला ताब्यात घेतलं असून दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणात आरोपीने मुलांना मारण्याचा प्रयत्न का केला? त्यांना मारण्याचा आरोपीचा हेतू काय होता? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने खळबळ उडाली असून गावात याची जोरदार चर्चा असून पोलीस संशयितांच्या मागावर आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!