Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्रातील या महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

या गाण्यावर खासदारांनी ठेका धरला. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, नेटकरी सैराट

अमरावती दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पण या राजकीय धामधुमीत खासदार नवनीत राणा यांचा एक हटके व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. आता नवरात्र काही दिवसांवरच येऊन ठेपली असताना नवनीत राणा यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

महिला वर्गाचा आवडता नवरात्र उत्सव काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे अनेक महिलांनी गरबा खेळासाठी तयारी सुरु केलेली आहे. अमरावतीतही अशाच एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नवनीत राणा या गरबा कार्यशाळेच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी गाण्याच्या तालीवर ठेका धरण्यापासून रोखू शकल्या नाहीत. गरबा पाहिल्यावर नवनीत राणांनी देखील गाण्यांवर रास गरबा खेळला. त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. गरब्यावर ताल धरल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध कमेंट करत आहेत. दरम्यान अमरावतीच्या सिटी सेंटरजवळ असलेल्या हरिश्चंद्र मंगलम लॉनमध्ये १० वर्षांपासून ‘विदर्भ गरबा किंग’च्या वतीने गरबा वर्कशॉपचं आयोजन करण्यात येते. अभिनेत्री राहिलेल्या राणा यांनी गेल्या वर्षी देखील नवरात्र उत्सवात त्यांनी डान्स केला होता. त्यावेळी त्यांनी येथील एका स्टॉलवर बुढ्ढी के बाल बनवले होते. बुढ्ढी के बाल बनवतानाचा त्यांचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे या दहीहंडी उत्सवात त्यांनी शिल्पा शेट्टीलाही डान्समध्ये टक्कर दिली होती. त्याचाही व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा स्वत: अभिनेत्री होत्या. त्यांनी तेलगू, तामिळ आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!