Just another WordPress site

‘या’ पुतळ्यावरून दुकानदाराला बेदम मारहाण

डोंबीवलीतील मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

डोंबिवली दि ४ (प्रतिनिधी)- डोंबीवलीत कपड्यांच्या डिस्प्लेसाठी लावलेला पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादातून एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

डोंबिवली पूर्वेला स्टेशनच्या जवळ राजेंद्र शेलार यांचे कपड्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकाना शेजारीच देवराज पटेल दुबरीया याचे देखील दुकान आहे. देवराज पटेल दुबरीया हा आपल्या दुकानातील कपड्याचा पुतळा शेलार यांच्या दुकाना जवळ ठेवत असत. अनेक वेळा विनंती करूनही देवराज तो पुतळा हटवत नव्हता. शेलार वारंवार पुतळा हटवायला सांगत याच कारणावरून देवराज दुबरिया, त्याची मुले मयुर आणि प्रितेश यांनी शेलार याच्या दुकानात सामानाची तोडफोड केली. यावेळी शेलार यांच्यासह त्यांची पत्नी सुवर्णा आणि मेहुणी अंजना यांना देखील बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणानंतर देवराज पटेल दुबरीया, मयुर पटेल दुबरीया, प्रितेश पटेल दुबरीया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामनगर पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र गुन्हा दाखल होऊन सीसीटीव्हीचा पुरावा असूनही पोलीसांनी आरोपींना अटक केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!