Just another WordPress site

मोबाईल काढण्यासाठी श्रुती टेरेसवरुन खाली वाकली आणि…

धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ पाहुन तुम्ही म्हणाल...

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- मुंबईतील नालासोपा-यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या गच्चीवर मोबाईलवर बोलताना हातातून निसटून टेरेसच्या सज्जावर पडलेला पडलेला मोबाईल काढायला गेलेली मुलगी इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडली.पण सुदैवाने मुलीचे प्राण वाचले आहेत पण ती गंभीर जखमी झाली आहे.सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.

अग्निशमन दलाच्या मदतीने या मुलीचे प्राण वाचवण्यात आले आहेत. नालासोपा-यातील रजनी अपार्टमेंटमध्ये राहणारी श्रुती पांडे ही मुलगी इमारतीच्या टेरेसवर गेली होती. मोबाईलवर बोलत असताना तिचा मोबाईल हातातून निसटला आणि टेरेसच्या सज्जावर पडला. त्यावेळी मोबाईल काढायला श्रुती खाली वाकली मात्र तिचा तोल गेल्यामुळे ती इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी ग्रीलवर आदळली. पण ती जसगा अडगळीची असल्याने तिला बाहेर निघण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने अडकून पडली होती. तिने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमन विभागाला फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दुसऱ्या मजल्याच्या घराच्या खिडकीची ग्रील कापून पत्र्यावर गेले आणि या मुलीची सुटका केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सर्वांनी अग्निशमन दलाचे काैतुक केले आहे.

GIF Advt

गच्चीवरून खाली पडल्याने मुलीच्या हाताला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण मोबाईच्या आहारी जाऊन अपघात होण्याच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत नशीब बलवत्तर म्हणून तरूणीचे प्राण वाचले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!