Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावत शुभमन गिलने केला अनोखा विक्रम

जे कोणालाच जमले नाही ते गिलने केले, बघा कोणत्या विश्वविक्रमाला गवसणी घातली

अहमदाबाद दि ११(प्रतिनिधी)- भारत आणि आॅस्ट्रेलियात चाैथा कसोटी सामना सुरू आहे. भारत या कसोटी मालिकेत २-१ आघाडीवर असला तरीही टेस्ट चॅम्पियनच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारताला विजय गरजेचा आहे. आज भारताने संयमी खेळ करत विजयाची आस जागवली आहे. या सामन्यात शुभमन गिलने अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. असा विक्रम करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरलाय.

चौथ्या कसोटीत शुभमन गिलने शतक झळकावले आणि आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. त्याने असा विक्रम केला आहे, जो कोणालाच करता आलेला नाही. क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरला सुद्धा अशी कामगिरी करता आलेली नाही. गिलने यापूर्वी वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने आता कसोटी क्रिकेटमध्येही शतक झळकावले आहे. या वर्षात आतापर्यंत त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावले आहे. एकाच वर्षात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारत शतक झळकावणारा गिल हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये जगभरात कोणत्याही खेळाडूला शतक झळकावता आलेले नाही. गिलने आपल्या खेळीत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२८ धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या दमदार खेळीने के. एल. राहुलचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. गिलने दमदार शतक झळकावत आपण फाॅर्म मध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. मागच्या दोन महिन्यात गिलनं तीन फॉरमॅट्समध्ये मिळून ५ सेंच्युरीज मारल्या आहेत.


आपल्या कामगिरी बरोबरच युवा फलंदाज गिलचा आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी संबंध जोडला गेला आहे. यापूर्वी त्याचे नाव महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी जोडले गेले होते. यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतही त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता नॅशनल क्रश म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेली रश्मिका मंदान्नाचं नाव आता शुभमन सोबत जोडले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!