
मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसत श्रीकांत शिंदे पाहतात कारभार
राष्ट्रवादीकडून फोटो व्हायरल झाल्यांतर श्रीकांत शिंदे म्हणाले...
मुंबई दि २३ (प्रतिनिधी)- राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता स्थापन झाल्यापासून सतत नवीन वाद होत आहेत. सुरुवातील निर्णय स्थागित केल्यामुळे वाद झाले. नंतर नंतर सरकारमधील मंत्री देखील वादात अडकले.पण आता एक फोटो व्हायरल झल्यामुळे खुद्द एकनाथ शिंदेच वादात सापडले आहेत. राष्ट्रवादीकडून एक फोटो ट्विट केल्यामुळे एक वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा वरपे यांच्याकडून करण्यात आला आहे. कारण पाठीमागे मुख्यमंत्री असे लिहिलेली पाटी आहे. वरपे यांनी शिंदे पितापुत्रांवर निशाणा साधला आहे. खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?, असे रविकांत वरपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. यावरुन अनेकजण राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री सतत दाै-यावर असतात. त्यामुळे त्यांचा मुलगा सरकार चालवत आहे का? असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. त्यामुळे शिंदे गटाने दावा केलेले दिवसातले २० तास नक्की कोण करतो असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.
खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?@mieknathshinde @DrSEShinde pic.twitter.com/rpOZimHnxL— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 23, 2022
व्हायरल फोटोवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे सक्षम मुख्यमंत्री आहेत. दिवसाचे1१८-१९ तास ते काम करतात, आणि त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा कारभार सांभाळायची कोणालाही आवश्यकता नाही असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.