Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात आवाज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच!

उद्धव ठाकरेंनी लढाई जिंकली, शिंदे गटाला आता या गोष्टीची भीती

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या दसरा मेळाव्याच्या लढाईत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय शिवसेनेसाठी उत्साह दुणावणारा आहे. तर शिंदे गटाच्या अडचणी वाढवणारा आहे.

शिवसेनेकडून २२ आॅगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. तर ३० आॅगस्टला शिंदे गटाने परवानगी मागितली होती. पण मुंबई महापालिकेने शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनाही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेना, शिंदे गट आणि मुंबई महापालिका यांच्याकडून युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने पालिकेचा निर्णय योग्य, उचित नाही असा शेरा मारत ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. पण यावेळी कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.न्यायालयाने सांगितले की, शिवसेना पक्ष कोणाचा यात आम्ही जात नाही. पण शिवाजी पार्कवरील अनेक कार्यक्रमाबाबत अधिसूचनेद्वारे तरतूद करण्यात आली आहे.त्यात दसरा मेळावा आहे तसेच २२ आॅगस्टला अर्ज केल्यानंतर २२ ऑगस्ट ते २१ सप्टेंबर या कालावधीत अर्जावर निर्णय का दिला नाही, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर पालिकेला देता आले नाही. आमच्या मते पालिकेचा निर्णय योग्य, उचित नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.

दसरा मेळावा आयोजनाशी संबंध नाही, असं सांगत शिंदे गटाचा हस्तक्षेप अर्ज म्हणजे आमदार सदा सरवणकर यांचा अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला लावला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे समीकरण यंदाही राहणार आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी बुस्टर डोस ठरणार आहे. या निर्णयाने शिंदे गटाला फटका बसणार असून गट फुटण्याची भीती शिंदेना राहणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!