Latest Marathi News
Ganesh J GIF

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

केदारनाथजवळील अपघात खराब हवामानामुळे की तांत्रिक बिघाडामुळे?

उत्तराखंड दि १८(प्रतिनिधी)- केदारनाथमध्ये एक मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गौरीकुंड येथे हा अपघात घडला असून आर्यन या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. बचावकार्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम पाठवण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये केदारनाथपासून २ किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ज्यावेळी अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये सहा जण असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरसंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. हा अपघात खराब हवामानामुळे झाला की हेलिकॉप्टरमधील काही तांत्रिक बिघाडामुळे झाला याचा आता तपास केला जाणार आहे. फाटा येथून पर्यटकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर केदारनाथमध्ये कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.तज्ज्ञांकडून आता या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपास केला जाणार आहे. या अपघातानंतर एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये धुके असून काही लोक डोंगरावर उभे असलेलेही दिसतात. दोन दिवसांनंतर पीएम मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार आहेत.

उत्तराखंडमध्ये २०१९मध्येही केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं होतं. केदारनाथला जाणाऱ्या यात्रेकरुना घेऊन जात होते. उड्डाण घेत असताना काही कारणास्तव पायलटला इमरजन्सी लँडिग करावी लागली आणि त्याच दरम्यान हेलिकॉप्टता अपघात झाला. याआधीही २०१३ मध्ये केदारनाथ ढगफुढी घटनेवेळी बचावकार्य करत असताना हवाई दलाचे एमआय-१७ सह तीन हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत २३ लोकांचा मृत्यू झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!